Login    |    Register
Menu Close

दिल्लीहून त्र्यंबकेश्वर ला कसे पोहचायचे? How To Reach Trimbakeshwar Temple From Delhi ?

delhi cover img-01

भारताची राजधानी, नवी दिल्ली हे सहसा “दिलवालों की दिल्ली” असे म्हटले जाते, जेथे लोक समाधानी आणि चैतन्यशील स्वभाव आहेत. दिल्लीबद्दलची असंख्य तथ्ये केवळ तिच्या मोठ्या संख्येने प्राचीन आणि ऐतिहासिक कलाकृतींमधूनच उद्भवत नाहीत तर ते भारत सरकारच्या तिन्ही शाखांचे घर आहे. हे शहर सध्या जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे.  दिल्ली हे शहर पूर्ण भारतामध्ये सर्व राज्यांना जोडले गेलेले महत्वाचे शहर आहे. त्यामुळे आपल्याला कुठेही यात्रा करण्यासाठी सहज कोणत्याही शहराला भेट देता येते. 

तर मित्रानो आज पाहणार आहोत कि दिल्ली हुन त्रयम्बकेश्वर ज्योतिलिंग ला पोहचण्यासाठी  विविध मार्ग आहेत. विमानाने, रेल्वे, बस, टॅक्सी इ. 

 

विमानाने प्रवास (By Air)

INDIRA GANDHI INTERNATIONAL AIRPORT (IGI)

इंदिरा गांधी एअरपोर्ट हे दिल्लीच्या सर्व बाजूंनी जवळ असलेले विमानतळ आहे. ह्या विमानतळापासून नाशिक ला येण्यासाठी खुप कमी वेळ लागतो. दिल्ली ते त्र्यंबकेश्वर हे अंतर 1034 कि.मी. एवढे आहे. विमानाने येण्यासाठी एक ते दीड तास लागतात.  विमानाने तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला ९ ते १० हजार रुपये  खर्च येईल. इंदिरा गांधी एअरपोर्ट ला पोहचण्यासाठी तुम्हाला टॅक्सी, बस किंवा मेट्रो रेल्वे उत्तम साधन आहे. 

सर्वप्रथम इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी फक्त 1 जवळचे मेट्रो स्टेशन आहे परंतु मार्ग वेगळे आहेत, ते तुमच्या स्थानावर अवलंबून आहे जिथून तुम्ही इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत आहात.  तेथून पुढे नाशिक गांधी नगर एअरपोर्ट वर आल्यानंतर तुम्हाला टॅक्सी किंवा बस वरून तुम्ही त्र्यंबकेश्वर ला पोहचू शकतो. नाशिक गांधीनगर एअरपोर्ट पासून ते अंतर  एकूण ३६ कि.मी. आहे. 

रेल्वे ने प्रवास (By Train)

त्र्यंबकेश्वर ला येण्यासाठी  रेल्वे हा एक उत्तम मार्ग आहे. दिल्ली पासून ते नाशिक ला येण्यासाठी भरपूर रेल्वे उपलब्ध असतात. आणि रेल्वे चा खर्च हि परवडेल असा असतो.  दिल्ली मध्ये निजामुद्दीन रेल्वे स्थानका पासून नाशिक ला येणाऱ्या रेल्वे तिकीट बुक करावे लागेल. नाशिक ला येणाऱ्या मेन ४ रेल्वे  आहेत. 

१)Chhatrapati Shivaji Maharaj Terminus

२)K.S.R. Bengaluru Rajdhani Express

३)Mumbai LTT Express

४)Rani Kamlapati (Habibganj)

 

यापैकी तुम्ही कुठलिही रेल्वे बुक करू शकता. 

रेल्वे ने येतांना तुम्हाला अनेक कलाकृतींचे आणि सांस्कृतिक शहरे मिळतील. जसे कि मथुरा, आगरा, ग्वालियर, झाँसी, भोपाळ, बुऱ्हाणपूर, जळगाव. 

 

रस्त्याने प्रवास (By Roadways)

दिल्लीहून बस किंवा कार ने येण्यासाठी मुख्य २ मार्ग आहेत. पहिला म्हणजे जयपूर मार्गे आणि दुसरा आग्रा. जयपूर कडून येण्यासाठी तुम्हाला २२ तास लागतील. ते साधारण १,२७३ कि.मी. आहे. आणि आग्रा मार्गे येतांना १२५३ कि.मी. आहे. त्यासाठी तुम्हाला २१ तास एवढा वेळ लागेल.  

रस्त्याने येतांना तुम्हाला प्रसिद्ध स्थळ आणि रेस्टोरेंट/हॉटेल्स  देखील मिळतात.  कि ज्यामुळे आपल्याला  प्रवास करतांना कोणत्याही गोष्टीची अडचण येत नाही. 

 

मथुरा 

सुरवातीला दिल्ली हुन येतांना आपल्याला भगवान श्री कृष्णाचे चे जन्मस्थान म्हणजेच मथुरा हे ऐतिहासिक शहराला तुम्ही भेट देऊ शकता. येथे तुम्हाला विविध पवित्र तीर्थस्थाने, पवित्र स्थळे आणि अनेक तीर्थक्षेत्रे यांचा मोठा संग्रह पाहायला मिळेल. येथे दरवर्षी देशातील भरपूर यात्रेकरू येतात.  आणि उत्तर प्रदेश राज्यात वृंदावन आणि मथुरा अशी पुष्कळ ठिकाणे आहेत ज्यांना पवित्र देवस्थानांच्या स्थापनेमुळे सन्मानित केले जाते. ही पवित्र शहरे भगवान कृष्णाच्या जन्मस्थानाचे गौरव करतात. 

 

मथुरेतील लोकप्रिय हिंदू मंदिरे  

 

१)श्री कृष्ण जन्मभूमी मंदिर

हे मंदिर मथुरेतील सर्वात पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते आणि हे हिंदूंसाठी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे कारण ते भगवान श्री कृष्णाचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते. त्याशिवाय, मंदिराच्या मुख्य गर्भगृहाच्या मागील बाजूस एक आकर्षण आहे, जे भगवान कृष्णाचा जन्म झालेल्या तुरुंगाचे प्रतिनिधित्व करते. पवित्र वास्तूच्या आतील भागात तुम्ही पुढे जाऊन पाहाल तेव्हा तुम्हाला भगवान कृष्णाची संगमरवरी मूर्ती देखील दिसेल. आणि भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे जन्माष्टमीच्या उत्सवादरम्यान, छप्पन भोग आणि होळीचे सण देखील मंदिराच्या आवारात साजरे केले जातात.

२)द्वारकाधीश मंदिर: 

 मथुरेतील सर्वात जुने आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक, द्वारकाधीश ही एक पवित्र रचना आहे जी त्याच्या पवित्र द्वारकाधीश (भगवान कृष्ण) यांना समर्पित आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत द्वारकेला गेले होते म्हणून या मंदिराला असे म्हणतात. मथुरेत मात्र द्वारकाधीश मंदिर शहराच्या पूर्वेकडील गाताश्रमा आणि विश्राम घाटाजवळ आहे आणि त्यात मुख्य मंदिरात राधा-कृष्णाची मूर्ती आहे.

आग्रा 

आग्रा हे भारतातील विविध गोष्टींसाठी ओळखले जाते. आग्रा येथे मुक्काम करण्यासाठी काही प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. जेथे तुम्ही पूर्ण परिवारासोबत भेट देऊ शकता. 

१)रामदा प्लाझा हॉटेल आग्रा

२)क्रिस्टल सरोवर प्रीमियर

३)रॅडिसन हॉटेल आग्रा

आग्रा हे भारतातील नावाजलेले शहर आहे. येथे विविध प्रकारचे 

त्यानंतर आग्र्याहून पुढे येताना मध्य प्रदेश उज्जैन येथे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग भारतातील महत्वाचे ज्योतिर्लिंगाला भेट देऊ शकता.   महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे शिवाला समर्पित एक हिंदू मंदिर आहे आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, तीर्थक्षेत्रे ज्यांना शिवाचे सर्वात पवित्र निवासस्थान मानले जाते .  हे मंदिर पवित्र शिप्रा नदीच्या बाजूला वसलेले आहे . प्रमुख देवता, लिंगम रूपातील शिव स्वयंभू आहे. उज्जैन शहराला अवंतिका असे म्हणतात आणि ते तिच्या सौंदर्यासाठी आणि भक्ती केंद्र म्हणून प्रसिद्ध होते.

 

नाशिक येथून त्र्यंबकेश्वर ला कसे जाऊ शकता ? how to reach tryambakeshwar from Nashik? 

 

नाशिक येथे आगमन झाल्यानंतर तुम्हाला येथे भव्य इमारती आणि मंदिरांचे दर्शन होईल. नाशिक येथे राहण्यासाठी काही प्रसिद्ध हॉटेल्स आणि रेस्टोरंट आहेत. नाशिक हे एक थंड हवेचे ठिकाण आहे.  नाशिक हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील प्रदेशातील एक सर्वात मोठे शहर आहे . गोदावरी नदीच्या काठावर वसलेले नाशिक हे महाराष्ट्रातील मुंबई , पुणे आणि नागपूर नंतर चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे . नाशिक हे कुंभमेळ्यासाठी हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे, जे दर 12 वर्षांनी आयोजित केले जाते. नाशिक येथे भारतातील अर्ध्याहून अधिक द्राक्ष बागे आणि वाईनरी येथे आहेत म्हणून या शहराला “भारताची वाईन कॅपिटल” असे  म्हटले जाते. भारतात उत्पादित होणार्‍या वाइनपैकी सुमारे 90% वाइन नाशिक खोर्‍यातून येते. 

 

नाशिक रेल्वे स्थानक पासून ते त्र्यंबकेश्वर ला कसे पोहचायचे ? How to reach trimbakeshwar from nashik railway station? 

स्टेशन रोड ते त्रंबकेश्वर हे साधारण अंतर : ४० कि. मी.  एवढे आहे.  त्र्यंबकेश्वर ला पोहचण्यासाठी १.५ तास लागतात. 

नाशिक रेल्वे स्थानक हे नाशिक रोड स्थानक म्हणून ओळखले जाते. हे रेल्वे स्थानक नाशिक शहरातील मुख्य रेल्वे स्थानक आहे. पूर्ण भारतातील मुख्य रेल्वे येथून च पुढे जातात. नाशिक रेल्वे स्टेशन पासून त्रंबकेश्वर ला जाण्यासाठी येथे सिटी बसेस किंवा  टॅक्सी उपलब्ध आहेत. नाशिक मध्ये जुने बस स्थानकापासून (old  CBS)  त्र्यंबकेश्वर कडे जाणाऱ्या भरपूर बसेस उपलब्ध असतात.  

 

त्र्यंबकेश्वर जवळ राहण्यासाठी काही प्रसिद्ध हॉटेल्स. 

  • Hotel sai yatri

  • Hotel Krushna

  • Three Leaves Hotel

  • Hotel Dhruv palace

  • Hotel Himalaya   

त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या काही महत्वाचे विधी आहेत. 

 

नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे जगप्रसिद्ध आहे. येथे येणारे भाविक आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्रंबकेश्वर ला भेट देतात. येथे विधी केल्याने सर्व पाप दूर होतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी येथे पंडितजी शास्त्रानुसार पूजा करतात. खालील पैकी महत्वाचे विधी: 

 

१) नारायण नागबली पूजा : गरुड पुराणानुसार, त्र्यंबकेश्वरमध्ये केली जाणारी महत्त्वाची पूजा म्हणजे नारायण नागबळी पूजा, पित्रांच्या आत्म शांतीसाठी केली जाणारी शांती पूजा. त्र्यंबकेश्वर येथे  नारायण नागबली पूजा हि दोन वेगवेगळ्या पूजांचे एकत्रीकरण आहे. ज्यामध्ये नागबळी पूजा व नारायण बळी पूजा यांचा समावेश आहे. ह्या दोन्ही पूजा त्र्यंबकेश्वर येथील पुरोहिसंघ गुरुजींकडून  नारायण नागबळी पूजा एकत्रितच केल्या जातात.

 

२)कालसर्प दोष शांती पूजा : त्र्यंबकेश्वर येथे केली जाणारी काळसर्प दोष पूजा ही एक महत्त्वाची पूजा आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश यांचे एकत्रित रूप येथे विराजमान असल्याने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पवित्र मानले जाते. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. 

 

३)त्रिपिंडी श्राद्ध विधी : त्रिपिंडी श्राद्ध पूजा ही श्री त्र्यंबकेश्वर शहरात केली जाणारी महत्त्वाची पूजा आहे. त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे तीन पिढ्यांच्या पूर्वजांचे विधीवत श्राद्ध. त्रिपिंडी श्राद्ध पूजा न केल्यास व्यक्तीला पितृदोषाचा त्रास होतो. पितृदोषात कुटुंबातील मृत सदस्य आपल्या वंशजांना शाप देतात, ज्याला पितृ शाप असेही म्हणतात. 

 

४)महामृत्युंजय मंत्र जप : नामस्मरणाने सर्वात सहज प्रसन्न होणारे एकमात्र देव म्हणजे देवाधिदेव महादेव होय. त्यांनाच मृत्यूवर विजय प्राप्त केलेली देवता – महामृत्युंजय  असे म्हटले जाते. जेव्हा भक्तांच्या जीवनात जन्मपत्रिकेत अल्पायु असते किंवा अकाली मरण असते तेव्हा ते टाळण्यासाठी महामृत्युंजय मंत्र जाप करावे असे शास्त्रात निर्देश केले आहेत. प्राचीन हिंदू ग्रंथ असलेल्या ऋग्वेद या पवित्र ग्रंथात महामृत्युंजय मंत्र आढळतो. 

Leave a Reply